Onion auction नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव दहा दिवसानंतर पूर्ववत, शेतकऱ्यांमध्ये समाधान - Onion auction resumed in Nashik district
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16791087-thumbnail-3x2-onion.jpg)
नाशिक दिवाळी आणि साप्ताहिक सुट्ट्या निमित्त गेल्या दहा दिवसांपासून बंद असलेले कांद्याचे लिलाव लासलगाव, येवलासह नाशिक जिल्ह्यातील पंधरा बाजार समितीमध्ये सुरू झाले आहेत. कांद्याच्या बाजारभाव साडेसातशे रुपयांची मोठी वाढ झाल्याने कांद्याचे प्रति क्विंंटल कमाल बाजारभाव 3 हजार रुपयांच्यावर गेल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसत आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती Agricultural Produce Market Committee आज सकाळच्या सत्रात 500 वाहनातून नऊ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. या कांद्याला कमाल 3100 रुपये, किमान 1000 रुपये तर सर्वसाधारण 2500 रुपये प्रतिक्विंटनला बाजार भाव मिळाला आहे. गेल्या आठवड्यात कांद्याला कमाल 2350 रुपये, किमान 600 रुपये तर सर्वसाधारण 1860 रुपये प्रतिक्विंटनला बाजार भाव मिळाला होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST