आंध्र प्रदेश : सहा गावे वाघाच्या दहशतीखाली, पिंजऱ्यात वाघ जात नसल्याने वाढली वनविभागाची डोकेदुखी - पिंजरे

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 6, 2022, 10:36 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

अमरावती ( आंध्र प्रदेश ) - आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात वाघांचा वावर वाढला आहे. मागील 16 दिवसांपासून सहा गावांतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 10 दिवसांपूर्वी उपनगरात वाघ फिरत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. तेव्हापासून सुमारे दीडशे अधिकारी व कर्मचारी वाघाचा शोध घेत आहेत. वन अधिकाऱ्यांनी वाघाच्या लपण्याचे ठिकाण शोधून काढले आहे. मात्र, वाघाला पुन्हा जंगलात पाठवण्याचे त्यांचे प्रयत्न फोल ठरत आहेत. वाघांच्या लपण्याच्या ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. मात्र, प्रत्येक वेळी वाघ पिंजऱ्याच्या जवळ जातो पण, पिंजऱ्यात जात नाही. हे तेथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये दिसून आले आहे. हा वाघ 15 किलोमिटरच्या परिघात असलेल्या प्रतिपाडू भागातील पोतुलुरी मंगा, कोडुरुपाका पांडवुलापलेम आणि सारभवरम या गावांमध्ये फिरत असल्याचेही आढळून आले आहे. सहा गावातील लोक वाघाच्या दहशतीत जगत आहेत. काकीनाडा जिल्ह्यातील प्रतिपदू झोनमधील ओमांगी गावाजवळ वाघाने दोन म्हशींची शिकार केल्याची माहिती मिळाली आहे. लोकांनी शेतीची कामे मध्येच थांबवली आहेत. ओमंगी गावातील शेतकरी आपली गुरे चरायला बाहेर काढत नाहीत. या वाघाला लवकरात लवकर पकडण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.