Old Man Died : रस्त्यावर पायी जाणाऱ्या वृद्धाला मोकाट बैलाची धडक, वृद्ध बसच्या खाली येऊन जागीच मृत्यू ; घटना सीसीटीव्ही कैद - डोंबिवली वृद्ध मृत्यू
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे : रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट बैलाने रस्तावरुन पायी जाणाऱ्या एका वृद्धाला पाठीमागून धडक दिली. त्याच सुमारास भरधाव खाजगी बस आल्याने त्याच बस खाली येऊन वृद्धाचा जागीच मृत्यू Old Man Died झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्हीत चित्रीकरण झाले असून याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अपघाताच्या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला. शिवराम धोत्रे (वय 68) असे अपघातात जागीच मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. डोंबिवली पुर्वेतील दत्तनगर परिसरात ही घटना घडली आहे. डोंबिवली पुर्वेतील दत्तनगर परिसरात मृत शिवराम धोत्रे हे कुटूंबासह राहत होते. २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास मृत शिवराम दत्तनगर मधील रस्त्यावर पायी जात होते. त्यावेळी त्यांच्या मागे मागे एक मोकाट जनावर जात असतानाच, अचानक या जनावराने त्यांना मागून धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर पडले तेवढ्यात मागून एक भरधाव खाजगी बस येऊन त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST