Nitish Kumar Statement: बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार - सात पक्षांचा पाठिंबा
🎬 Watch Now: Feature Video
पाटणा - बिहारमधील राजकीय संकटानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच महाआघाडी सरकार स्थापन करण्याचा दावा केला. सरकार स्थापनेचा दावा मांडल्यानंतर नितीशकुमार म्हणाले की, आम्हाला सात पक्षांचा पाठिंबा आहे. त्यात 164 आमदारांचा समावेश आहे. आम्ही एकत्र काम करू आणि बिहारला पुढे नेण्यासाठी काम करू. यासोबतच नितीशकुमार यांनी भाजपवरही निशाणा साधला. ते म्हणाले की "आमच्या पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे की आपण त्यांच्यापासून वेगळे व्हावे. तो पक्षाचा निर्णय आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आमची भूमिका एकच आहे.” आज संध्याकाळी 8 वाजता शपथविधी समारंभ होणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST