Nimba Devi Dam Video : प्रशासनाच्यावतीने निंबा देवी धरण क्षेत्रात बंदी असतानाही पर्यटकांनी केली गर्दी - धरण क्षेत्रात बंदी
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील ( Jalgaon District ) यावल तालुक्यातल्या सातपुड्याच्या पर्वत रांगामध्ये ( Mountain Range of Satpuda ) असलेले निंबा देवी धरण पूर्णपणे भरल्याने ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे या निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या निंबा देवी धरणावर ( Nimba Devi Dam ) पर्यटकांची मोठी गर्दी उसळली असून, आज सुटीचा दिवस असल्याने महाराष्ट्र, मध्य प्रदेशमधून हजारो पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे. या ठिकाणी तरुण-तरुणींची पाण्यावर झुंबड उडाल्याचे आपल्याला दिसत आहे. या ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचा आनंद तरुण-तरुणी घेताना दिसत आहेत.
प्रशासनाच्या वतीने धरण क्षेत्रात बंदी करण्यात आली ( Despite The ban on Dam for Tourists ) आहे. पर्यटकांना धरण क्षेत्रात बंदी असूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी जमल्याचे आपल्याला दिसून येत आहे. जीवघेणा प्रसंग या ठिकाणी ओढवू शकतो. तरीही पर्यटक येथे जमा झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST