Sharad Pawar Threaten Case शरद पवारांच्या केसाला धक्का लागला, तर ही सरकारची जबाबदारी - राजेश टोपे
🎬 Watch Now: Feature Video
जालना - राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार ( Nationalist Congress Party Chief Sharad Pawar ) यांना धमकीचे फोन येत आहेत. मात्र यांच्या केसालाही धक्का लागला नाही पाहिजे, ही सरकारची जबाबदारी असल्याचा इशारा राष्ट्रावादीचे आमदार राजेश टोपे ( NCP Leader Rajesh Tope ) यांनी राज्य सरकारला दिला.
मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ( Accused Threaten To NCP Chief Sharad Pawar ) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र वारंवार फोन करून शरद पवार ( Nationalist Congress Party Chief Sharad Pawar ) यांना एक माथेफिरु फोन करून शिव्या देत असल्याची माहिती टोपे यांनी यावेळी दिली. त्यामुळे या माथेफिरुचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी टोपे ( Rajesh Tope Demand To Arrest Accused ) यांनी केली. तर शरद पवार यांच्या केसलाही धक्का लागला नाही पाहिजे, याची सर्व जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. त्यामुळे शरद पवार ( Nationalist Congress Party Chief Sharad Pawar ) यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणीही राजेश टोपे यांनी केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST