Chhagan Bhujbal on Sharad Pawar Resign : शरद पवार यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जाईल - छगन भुजबळ - छगन भुजबळ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 3, 2023, 3:03 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर म्हणाले, आज कुठलीही नेत्यांची बैठक, कमिटीची बैठक किंवा साहेबांनी जाहीर केलेल्या बैठकी, अशी कुठलीही बैठक आज बोलावण्यात आलेली नाही. आमचे काही सहकारी, काही मार्केट कमिटीच्या ज्या निवडणुका झाल्या, त्या कामासंदर्भात किंवा साखर कारखान्याच्या काही अर्जंट कामामुळे किंवा संस्थांच्या कामामुळे मुंबईच्या बाहेर आहे. आम्ही मुंबईमध्ये आहोत. तसेच देशातील काही राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जे प्रमुख आहेत, ते शरद पवार यांना त्यांचा निर्णय थांबवावा किंवा मागे घ्यावा, अशी विनंती करत आहेत. काही जिल्ह्यातील नेते, काही राज्यातील नेते, काही शहरातील नेते आलेले आहेत. एक - दोन दिवसातच एक मिटींग होईल आणि तोपर्यंत शरद पवार यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जाईल. पुढे काय पाऊल उचलायचे आहे, हे सर्व नेते मंडळी ठरवतील. जयंत पाटील आणि इतर नेते आज मुंबईमध्ये नाही. सगळे पुढच्या मिटींगमध्ये हजर राहतील. जयंत पाटील कदाचित संध्याकाळपर्यंतच परत येणार आहेl. परंतु काही चॅनलवर दाखवले जात आहे की, मिटींग चालू आहे आणि जयंत पाटलांना बोलावले नाही, परंतु असे काहीही नाही. शरद पवार यांनी सांगितले की. मला दोन- तीन दिवस विचार करायला वेळ द्या. त्यासाठी पुन्ही आमचा प्रस्ताव सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.