Bathukamma Festival Solapur : तेलंगाणाची संस्कृती महाराष्ट्रात; केसीआर यांची कन्या कविता अक्काचा सहभाग; पाहा व्हिडिओ - solapur News
🎬 Watch Now: Feature Video


Published : Oct 22, 2023, 8:25 PM IST
सोलापूर : Bathukamma Festival Solapur : शहरातील 'बतकम्मा उत्सवा'त आमदार कविता अक्का रमल्या होत्या. 'बीआरएस' पक्षात नुकतेच प्रवेश केलेले नागेश वल्याळ (Nagesh Valyal) यांच्या निवासस्थानी के कविता आल्या होत्या. तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर (K Chandrasekhar Rao) यांच्या कन्या आमदार कविता अक्का (Kavita Akka) शहरात साजरा होणाऱ्या बतकम्मा उत्सवात (Bathukamma) सहभागी झाल्या होत्या. पूर्व भागातील तेलुगु भाषिक समाजाचा आनंद उत्सव म्हणून हा पुष्पोत्सव ओळखला जातो. नवरात्री (solapur Navratri Festival ) निमित्त हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. तेलंगाणा प्रांतातील महिला हा आनंदोत्सव पितृपक्ष अमावस्या अष्टमीपर्यंत साजरा करतात. हळदीने गौरीदेवी बनवून निसर्गातील विविध फुले आणतात. फुलांचा गोपूर बनवून पारंपरिक लोकगीते म्हणतात. हा उत्सव ज्येष्ठ महिला घरात सुख-शांती ऐश्वर्य प्राप्तीसाठी, विवाहित महिला संतानप्राप्तीसाठी, कुमारी उत्तम वर मिळण्यासाठी या बतकम्मा भोवती फेर धरतात. तेलंगाणाची संस्कृती महाराष्ट्र राज्यात जपण्यासाठी आमदार के कविता सोलापुरात आल्या होत्या.