Navratri 2023 : श्रद्धेपुढं मिटल्या धर्माच्या भिंती! 18 वर्षांपासून मुस्लिम कुटुंबीयाकडून नवरात्रीत देवीची आराधना, पहा व्हिडिओ - Muslim family worships goddess in Navratri
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 22, 2023, 7:15 AM IST
श्रीरामपूर ( अहमदनगर) Navratri 2023 : जगभरात धार्मिक विद्वेष वाढत असताना अहमदनगरमध्ये धार्मिकतेपलीकडं श्रद्धा असल्याचे उदाहरण समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एक मुस्लिम कुटुंब देवीवर असलेल्या श्रद्धेतून गेल्या 18 वर्षांपासून देवीची मनोभावे आराधना करीत आहेत. शहरातील गोंधवणी रोड येथं आपल्या कुटुंबासमवेत वास्तव्यास असलेल्या मुमताज शब्बीर शहा यांचे २००५ साली आरोग्य बिघडले. मात्र, अनेक उपाचार घेऊनही त्यांना फरक पडत नव्हता. यादरम्यान शेजारी राहणाऱ्या एका हिंदू कुटुंबियांसमवेत त्यांनी देवीची आराधना केली. त्यानंतर मुमताज यांना आपल्या प्रकृतीत बदल जाणवायला लागला. तेव्हा अनेकांनी त्यांना देवीची आराधना सुरू करण्याचा सल्ला दिला. द्विधा मनस्थितीत त्यांनी श्रद्धेला महत्त्व दिलं. वेळप्रसंगी आपल्या धर्मातील विरोध पत्करून आपल्या अल्लासह देवीच्या रूपात परमेश्वर बघत, मुमताज यांनी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून 18 वर्षांपूर्वी आदिशक्तीची उपासना सुरू केली. दरवर्षी नवरात्रीत ते घटस्थापना करुन नऊ दिवसांच्या उपवासासह हिंदू परंपरेप्रमाणे मनोभावे सर्व पुजाअर्चा देखील करतात. पत्नीच्या या श्रद्धेला त्यांचे पती शब्बीर शहा यांनी मोलाची साथ दिली. समाजाता धार्मिक सलोखा राहावा, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्ती करण्यात येत आहे.