Narendra Modi Birthday : पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त दिल्या संस्कृतमध्ये शुभेच्छा, Watch Video - मोदींना संस्कृतमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 17, 2023, 2:24 PM IST
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७३ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर देश-विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर, अक्षय कुमार, राजकुमार राव, कंगना राणावत अशा विविध बॉलिवुड सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, या सर्व शुभेच्छांमध्ये पंतप्रधान मोदींना एका महिलेनं दिलेल्या अनोख्या शुभेच्छाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय. नरेंद्र मोदीनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दिल्ली विमानतळ मेट्रो एक्स्प्रेसच्या विस्तारित मार्गाचं उद्घाटन केलं. ही मेट्रो द्वारका सेक्टर २१ ते द्वारका सेक्टर २५ ला जोडेल. उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी मेट्रोनं प्रवास केला. तेव्हा मेट्रोत त्यांची भेट एका महिला प्रवाशाशी झाली. या महिलेनं पंतप्रधान मोदींना संस्कृतमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पहा या महिलेचा हा व्हिडिओ.