Nagpur Police Video Viral: व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तीन पोलिसांचे निलंबन, पहा नागपूुरातील चौकीचा धक्कादायक व्हिडिओ - लकडी का पूल परिसरातील गुन्हे शाखेचे कार्यालय
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/09-08-2023/640-480-19218686-thumbnail-16x9-nagpur.jpg)
नागपूर: लाकडी पूल परिसरातील गुन्हे शाखा कार्यालयात पत्त्यांचा डाव रंगल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये 3 पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य विसरुन जुगारात रमले असल्याचे दिसत आहे. नागपूर पोलीस आयुक्तांनी या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे आहे. साधारण 15 सेकंदाच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये 3 पोलीस कर्मचारी जुगार खेळत आहेत. तर काही कर्मचारी हे काम करताना दिसत आहेत. एप्रिल महिन्यात असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ नवीन कामठी पोलीस ठाण्यातील होता. त्या व्हिडिओमध्ये ४ कर्मचारी कर्तव्यावर असताना दारूचे सेवन करत जुगार खेळताना दिसले होते. त्यावेळी अवघ्या चार तासात जुगार खेळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.