न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी मुंबईकरांचा उत्साह; मरीन ड्राईव्हवर फटाके फोडण्यास मनाई, तगडा पोलीस बंदोबस्त तैनात - सरत्या वर्षाला निरोप
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 31, 2023, 8:20 PM IST
|Updated : Dec 31, 2023, 8:45 PM IST
मुंबई New Year Celebration 2024 : नववर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अशातच नववर्षाच्या निमित्तानं सर्व काही सुरळीत होण्यासाठी प्रशासनंही पुर्ण तयारीत आहे. 2023 या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 2024 या नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर ज्याप्रमाणे सज्ज झाले आहेत, त्याचप्रमाणं मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) देखील सुरक्षेसाठी कंबर कसली आहे. मोठ्या संख्येने गर्दी होणारी ठिकाणं असलेल्या मरीन ड्राईव्ह (Marine Drive) येथे देखील नागरिकांनी नववर्षाचा जल्लोष करण्यासाठी गर्दी केलेली आहे. त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर पोलिसांची सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे वाहतूक पोलीस देखील सज्ज असून तळीरामांवर त्यांची करडी नजर असणार आहे. तर नागरिकांच्या उत्साहाला आणि आनंदाला गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलीस (Mumbai Police) अलर्ट मोडवर आले आहेत.