Mumbai Local Train: मुंबईत आज लोकल ट्रेन उशिरा, फलाटावर प्रवाशांची गर्दी - train late due to Technical problem at Borivali
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13-07-2023/640-480-18985881-thumbnail-16x9-local-train.jpg)
मुंबई : मुंबईत आज लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे सकाळच्या सुमारास दुपारपासून सायंकाळपर्यंत गाड्या उशिराने धावल्या आहेत. बोरिवली ते चर्चगेटकडे जाणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्या ३५ ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत. फास्ट आणि स्लो या दोन्ही लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत. तांत्रिक अडचणीमुळे ट्रेन उशिराने धावत असल्याची माहिती मिळत आहे. लोकल ट्रेन उशिराने धावल्याने प्रवासी नाराज झाले आहेत. पश्चिम रेल्वेचे पीआरओ म्हणाले की, बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ बिघाड झाला होता. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. बोरिवली स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने ही समस्या झाली. सकाळी ऑफिसला जाण्यासाठी लोकांना उशीर होत असल्याने फलाटावर मोठी गर्दी झाली होती. मुंबईच्या लोकल गाड्या अनेकदा नीट धावत नाहीत, त्यामुळे सर्वसामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.