रेल्वे प्लॅटफॉर्मवर डान्स करणं पडलं महागात! गुन्हा दाखल होताच सीमा कनोजियानं मागितली माफी - Seema Kanojia viral video

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 9:25 AM IST

मुंबई Viral Dance Video :   यू ट्युबर सीमा कनोजिया ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कॉमेडी, डान्स आणि गाण्याचे व्हिडिओ पोस्ट करते. तसंच सीमा कनोजिया आपल्या बोलण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळंदेखील ओळखली जाते. काही दिवसांपूर्वीच सीमा कनोजियानं रेल्वे प्लॅटफॉर्मवर जमिनीवर लोळत विविध डान्स स्टेप्स केल्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामसह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला होता. मात्र, या व्हिडिओमुळं आता ती अडचणीत सापडलीय. याचं कारण म्हणजे मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकावर सीमा कनोजिया हिनं डान्स केला. रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना जिथं पाय ठेवायला जागा नसते. तिथं मात्र ऐन गर्दीवेळी सीमा कनोजिया हिनं डान्स केला. तसंच तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मात्र, त्यानंतर बेकायदेशीर नृत्य प्रकरणी तिच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. तसंच या प्रकारचे व्हिडिओ पाहून व्हिडिओ बनवण्यासाठी इतरही प्रेरीत होतात, असं पोलिसांनी म्हंटलंय. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सीमा कनोजियानं माफी मागितली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे म्हणाले की, 'रेल्वे स्थानकात अश्या प्रकारे नृत्य करणं गुन्हा आहे. नियमानुसार सीमा कनोजियावर कारवाई केली आहे. जनतेने देखील यातून धडा घ्यावा.'

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.