Udayanraje Bhosale : '..म्हणूनच आम्ही त्यांना गटवलं'; रामदास आठवलेंवर उदयनराजेंची कविता, पाहा व्हिडिओ - MP Udayanraje Bhosale On Ramdas Athawale
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 27, 2023, 9:29 PM IST
सातारा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे नेते, रामदास आठवले यांची कविता ऐकली नसेल असा महाराष्ट्रातील एकही नेता नसेल. तर हटके स्टाईल आणि डायलॉगबाजीमुळे मोठे फॅन फॉलोईंग असणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांनी आज चक्क रामदास आठवलेंवर कविता सादर केली. 'आमच्या मनात आहेत रामदासजी आठवले, म्हणूनच आम्ही त्यांना गटवले', ही कविता सादर करून उदयनराजेंनी रामदास आठवलेंसह रिपाइं गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकवला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर मेळाव्यासाठी साताऱ्यात आले होते. या मेळाव्याला खासदार उदयनराजेही उपस्थित होते. यावेळी उदयनराजेंनी आठवलेंवर त्यांच्या स्टाईलने कविता सादर करत रामदास आठवले आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांना खूश केले. मला कविता येत नाही, पण दिल्लीला गेल्यावर त्यांच्याकडून शिकून घेतो, अशी मिश्किल टिपण्णीही उदयनराजेंनी केली.