Maharashtra Monsoon Assembly Session हे गद्दार सरकार आहे ते कोसळणार म्हणजे कोसळणारच आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया - Shiv Sena MLA Aditya Thackeray
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांनी यावेळी दिली आहे. सोबतच आमदार प्रकाश सुर्वे Prakash Surve यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, हे डरपोकांचे विधान आहे. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशानाला Maharashtra Monsoon Assembly Session आजपासून सुरुवात झाली. त्यावेळी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर निषेध करताना आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन कसे राहणार आहे, याची झलक सुरुवातीलाच बघायला मिळाली आहे. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून ईडी सरकार हाय हाय, स्थगिती सरकार हाय हाय अशा घोषणाबाजी करत शिंदे फडणवीस सरकारचा जोरदार निषेध केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST