कराडमधील एसबीएस कॉलेजमध्ये तलाठी, वकील, शिक्षक गिरवताहेत मोडी भाषेचे धडे, पाहा व्हिडिओ - SBS College Karad
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 16, 2023, 11:05 PM IST
सातारा SBS College Karad : इतिहासात डोकावण्याची एकच खिडकी म्हणजे मोडी लिपी! सध्या राज्यात सुरु असलेल्या कुणबी नोंदी तपासण्याच्या कामाला मोडी भाषा जाणकारांची भासणारी गरज तेच अधोरेखित करते. सरकारी कार्यालयांमध्ये जुनी कागदपत्रे मोडी लिपीत असल्याने त्यांचे वाचन करून अर्थ समजणे अवघड जाते. अशावेळी मोडी जाणाऱ्या लोकांना बोलावून ती वाचून घेतली जात आहेत. मोडी भाषा वाचता येणारे अतिशय दुर्मिळ आहेत. त्यामुळे मोडी भाषेचे महत्त्व ओळखून कराडमधील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे (एसबीएस) महाविद्यालयाने तीन महिन्यांपूर्वी मोडीचा कोर्स सुरू केला आहे. इतिहास संशोधकांसह तलाठी, वकील, डॉक्टर, शिक्षक आणि ज्योतिषतज्ज्ञ देखील त्याठिकाणी मोडी भाषा शिकत आहेत. या कोर्समुळे मोडी भाषा वाचणाऱ्यांची संख्या भविष्यात वाढत जाणार आहे.