Mobile Bus Waiting Shed या ठिकाणी आहे अनोखे फिरते बस वेटिंग शेड, पाहा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
कासारगोड, केरळ केरळमधील कासारगोड येथे महामार्ग रुंदीकरणाच्या कामांतर्गत बसचे वेटिंग शेड पाडण्यात आले. त्यामुळे शाळकरी मुलांसह प्रवाशांना कडाक्याच्या उन्हात किंवा पावसात उघड्यावर बसची प्रतीक्षा करावी लागत होती. पेरिया येथील तरुणांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांना मोबाईल बस वेटिंग शेड बांधण्याची अनोखी कल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी परिसरातील व्यापारी आणि सामाजिक संस्थांशी संपर्क साधून निधी उभारला आणि फिरते बस वेटिंग शेड बांधले. हे शेड मोटारसायकलला हुक करून कोणत्याही ठिकाणी हलवता येते. प्रवाशांची मागणी आणि गर्दी लक्षात घेऊन बसशेड एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवले जाईल. बसची वाट पाहत असताना प्रवाशांना बसण्यासाठी जागाही यात आहे. हे मोबाईल बस वेटिंग शेड अवघ्या 10 दिवसात बांधले गेले आणि आता ते पेरिया परिसरात खूप लोकप्रिय होत आहे. Mobile Bus Waiting Shed. Mobile Bus Waiting Shed in Kasaragod
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST