Video : जळगावात मनसे पदाधिकाऱ्यांकडून हनुमान मंदिरात आरती - शनी मंदिर जळगाव
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव - मनसैनिकांनी आज सकाळी सहा वाजेनंतर शनी मंदिरात आरती करत हनुमान चालीसा म्हटली. या कार्यक्रमासाठी मनसैनिकांनी पोलीस प्रशासनाची परवानगी घेतली होती. पोलीस प्रशासनाने दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहून हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडला नाही. जळगाव शहरातील ममुराबाद रस्त्यावर असलेल्या शनी मंदिर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान आज पहाटे मशिदीवरील भोंग्याचा आवाज आला नाही, असा दावाही मनसैनिकांनी यावेळी केला. कोणत्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने काल रात्रीच मनसैनिकांना नोटीस बजावल्या होत्या. शहरात तीन ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST