Amit Thackeray अमित ठाकरे येणार सांगली दौऱ्यावर, विद्यार्थ्यांशी साधणार आहेत संवाद - अमित ठाकरे येणार सांगली दौऱ्यावर
🎬 Watch Now: Feature Video
सांगली मनसे युवा नेते अमित ठाकरे Amit Thackeray हे सांगली जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. Amit Thackeray Sangli district tour. 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी अमित ठाकरे या दौऱ्यावर येणार असून यावेळी ते प्रामुख्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. अमित ठाकरे प्रथमच सांगली जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने जिल्ह्यामध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. तसेच इस्लामपूर आणि आष्टा या ठिकाणी पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन देखील अमित ठाकरे यांच्या हस्ते पार पडणार आहे. अमित ठाकरे जिल्ह्यातील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधणार असल्याचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST