Rohit Pawar : भांडणं लावून भाजपाने आपला हेतू साध्य केला - रोहित पवार - Sharad Pawar Group Ajit Pawar
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडानंतर अनेक नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आहेत. शरद पवार गटात असलेले नेते अजित पवार यांच्यावर का बोलत नाहीत असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. त्यावर आता रोहित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. भाजपाच्या रणनितीला आम्ही फसणार नसून, आपसात भांडण लावून आपला हेतू साध्य करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तिकडे गेलेल्या नेत्यांबद्दल न बोलता मूळ कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. भाजपाविरोधात आम्ही लढत राहणार आहोत. बीडमध्ये होणाऱ्या सभेत अजित पवार गटाचे नेते काय बोलतात त्याकडे आमचे लक्ष आहे. सुरुवातीला त्यांना भाजपाबद्दल बोलावे लागणार असा अंदाज आहे, असे रोहित पवार यावेळी म्हणाले.