MLA Rajan Salvi News: आमदार साळवी यांचे कुटूंब एसीबीच्या रडारवर, काय म्हणाले राजन साळवी? - एसीबीकडून नोटीस
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचा मोठा भाऊ आणि वहिनीला एसीबीकडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती साळवी यांनी विधानभवनात दिली. एसीबीने यापूर्वी माझी तीन वेळा चौकशी केली. स्वीय सहाय्यकांना चौकशीला बोलावले. येत्या २० मार्चला पुन्हा सगळ्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. आता, साळवींचे कुटुंब ईडीच्या रडारवर आले आहे. माझ्या मालमत्तेविषयी 4 महिन्यांपूर्वी नोटीस आली होती. मी त्याला सामोरा गेलो. आजवर 2200 लोकांना नोटीस दिल्या आहेत. माझी पत्नी अनुजा, भाऊ दीपक आणि वहिनी अनुराधा यांना देखील आज सकाळी नोटीस आली आहे. स्वीय सहाय्यकाला देखील नोटीस देण्यात आली. वडिलोपार्जित जमीनची चौकशी केली जात आहे. ज्या घरावर बँकेचे कर्ज आहे, त्याला ही नोटीस दिली आहे. मला नोटीस पाठवली, त्या चौकशीला सामोरा गेलो. परंतु, कुटुंबाला नोटीस बजावणे ही बाब दुर्दैवी आहे, असे साळवी म्हणाले.