मनोज जरांगेंची पुन्हा राजसरकरासह भुजबळांवर टीका, आमदार प्रकाश सोळंकेंचं घर पेटवल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर - Manoj Jarange Patil
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 5, 2023, 6:54 PM IST
बीड Prakash Solanke House cctv Footage : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी त्यांच्या राज्यातील चौथ्या टप्प्यातील सभांना सुरूवात केली आहे. आजही त्यांनी मंत्री छगन भुजबळ आणि राज्य सरकारवर अकोल्यात सडकून टीका केली. भुजबळांच्यावर भांडणे लावत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. तसंच मराठा समाज ओबीसीतच असल्याचं ३६ लाख नोंदीवरुन कळून आलं आहे. त्यामुळेच गेल्या सत्तर वर्षात समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवल्याची खंत जरांगे यांनी बोलून दाखवली. त्याचवेळी जर हे आरक्षण दिलं असतं तर मराठा समाज सर्वात प्रगत ठरला असता, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपूर्वी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला असताना ३० ऑक्टोबरला रोजी माजलगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्या घरावर मराठा समाजाच्या आंदोलकांनी दगडफेक करत त्यांचं घरंच पेटवल्याचं पाहायला मिळालं होतं. इतकंच नाहीतर प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याच्या आवारात उभी असलेली वाहनं देखील मराठा आंदोलकांनी पेटवली होती. यामुळं राज्यात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. याच संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
'या' लोकांवर कारवाई करावी : माझ्या घरावर झालेल्या हल्ल्याच्यावेळी पोलीस प्रशासनानं कसलाही प्रतिकार केला नाही. विशेष म्हणजे मराठा आंदोलनामध्ये मी अनेक वेळा सहभाग घेतला होता. या घडलेल्या घटनेमध्ये जे लोक बघ्याची भूमिका घेत आहेत त्यांच्यावर मात्र कारवाई करू नका, जे लोक दगडफेक करत आहेत जे लोक जाळपोळ करत आहेत अशाच लोकांवर कारवाई करावी. ज्या लोकांनी हा प्रकार केला ते लोक मात्र माझ्या जीवाला धोका पोहोचण्यासाठी माझ्या बेडरूम पर्यंत पोहोचले होते. माझ्या बेडरूम मधील टीव्ही देखील फोडला. या आंदोलनामध्ये राजेंद्र होके, रामचंद्र डोईजड, अजय राऊत हे तीन तरुण गेली अनेक वर्षापासून नेतृत्व करत आहेत. मात्र त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केले ते मागे घेण्यात यावे, असं प्रकाश सोळंके यांनी सांगितलं.