कायद्याच्या चौकटीत 16 आमदार अपात्रच; कायदेतज्ञ उल्हास बापट
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षाबाबत आज सर्वात मोठी घडामोड असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सायंकाळी ४ नंतर निकाल देणार आहेत. सर्वांचेच लक्ष या निकालाकडे लागले आहे. त्यापूर्वी घटनातज्ञ उल्हास बापट यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की जगात भारत एकमेव असा देश आहे की 75 वर्षापासून आपण लोकशाही मानत आलेलो आहे. आपली लोकशाही ही जास्त जोमाने वाढत आहे. लोकशाहीच्या बाबतीत एक दीपस्तंभ म्हणून आपण उभे आहोत. तसंच यासाठी राजीव गांधी यांनी पक्षांतर बंदीचा कायदा आणला आणि आत्ता याच कायद्यातून पळवाट ही काढली जातं आहे. याला राजकीय लोक तसंच त्यांना सल्ला देणारे वकील हे देखील जबाबदार आहेत. आजचा निर्णय विधानसभा अध्यक्ष हे बरोबर देतील ही अपेक्षा आहे. कायद्यानुसार जर बघितलं तर शिवसेनेचे 16 आमदार हे अपात्र आहेत. पण आत्ता विधानसभा अध्यक्ष हे आज याबाबत काय निर्णय देतील हे पाहावं लागणार आहे, असं यावेळी बापट म्हणाले.