Dhananjay Munde : कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आमदार धनंजय मुंडे यांचा परळीत सत्कार
🎬 Watch Now: Feature Video
बीड : महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आमदार धनंजय मुंडे यांचा परळी येथे जाहिर सत्कार ( MLA Dhananjay Munde felicitated at Parli ) करण्यात आला आहे. बीडच्या परळीत कार्यक्रमात आज सायंकाळी धनंजय मुंडे काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच परळीत येत आहे. या निमित्ताने परळी वैद्यनाथ येथे सायंकाळी प्रचंड जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या जाहीर सभेच्या निमित्ताने परळी वैद्यनाथ शहरात पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थक आमदारांसह 2 जुलै रोजी राज्य सरकारमध्ये प्रवेश केला होता. ( New Deputy Chief Minister of Maharashtra) यावेळी त्यांनी इतर ९ जणांसह मंत्री म्हणून लगेच शपथ घेतली होती. अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री झाले आहेत. तर, (Ajit Pawar Deputy Chief Minister of Maharashtra ) इतर ८ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती.