Gulabrao Patil बाहेरच्या माणसाला शिवाजी महाराजांबद्दल बोलायचे असेल तर... गुलाबराव पाटलांचा राज्यपालांना टोला - शिवाजी महाराज होते म्हणून आपण आहोत
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द Slander about Chhatrapati Shivaji Maharaj बोलणाऱ्या विरोधात उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे आक्रमक झाले असून उदयनराजे भोसले यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तर मी उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या सूचना प्रत्येकाने अमलात आणल्या पाहिजे होते. राजे असल्यामुळे मी त्यांना विनंती करू शकतो की आपण आंदोलन न करता यावर सर्व मिळून मार्ग काढू अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत बोलताना गुलाबराव पाटील असो किंवा राज्यपाल अथवा कोणीही मोठ्या पदाचा व्यक्ती सर्वांनी सांभाळून व संयमाने बोलायला हवे शिवाजी महाराज होते म्हणून आपण आहोत. हे सर्वांनी भान ठेवायला हवे तसेच बाहेरच्या माणसाला शिवाजी महाराजांबद्दल बोलायचे असेल तर महाराजांचे चरित्र व त्यांनी अभ्यास करावा असा टोला यावेळी गुलाबराव पाटील यांनी राज्यपालांना लगावला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST