Massive Fire In Beed: बीडच्या ऑइल मिलला भीषण आग; लाखो रुपयाचे सरकीचे पोते, बारदानाची झाली राख - बारदानाची झाली राख
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/640-480-18258267-thumbnail-16x9-oil2.jpg)
बीड: माजलगाव शहरापासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या मुंदडा उद्योग समूहाच्या ऑईल मिलला भीषण आग लागली. ही आग संध्याकाळी उशिरा लागली. आगीत मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक माहिती आहे. माजलगाव तालुक्यातील केसापुरी शिवारात असलेल्या कल्याण विशाखापट्टणम महामार्गावर माजलगाव – गेवराई रोडवर रामदयाल मुंदडा यांचे मुंदडा उद्योग समूह आहे. येथे दालमिल व ऑईल मिल आहे. शुक्रवारी रात्री 11.00 च्या दरम्यान अचानक मिलला आग लागली. या आगीत सरकी असलेले हजारो पोते जळून खाक झाले आहेत. त्याचबरोबर लाखो रुपयांचा बारदाना जळाले आहेत. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग विझविण्यासाठी माजलगाव नगर परिषदचे अग्निशमन दल, मानवत नगर परिषदचे अग्निशमन दल, गेवराई नगर परिषदचे अग्निशमन दल, बीड नगर परिषदचे अग्निशमन दल, धारुर नगर परिषदचे अग्निशमन दलाकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहे. आग कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. तरी घटनास्थळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात आहे. आग लागल्यानंतर जोराची हवा सुटल्याने आग सर्वत्र पसरली. त्यामुळे आगीवर ताबा मिळवणे शक्य झाले नाही. तर अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.