Maratha Reservation : ...अन्यथा जिल्ह्यात फिरू देणार नाही; मराठा आरक्षणावरून तरुणांनी अडवला प्रितम मुंडेंचा ताफा - मनोज जरांगे पाटील
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18-10-2023/640-480-19795613-thumbnail-16x9--maratha-reservation.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Oct 18, 2023, 10:47 AM IST
माजलगाव (बीड) Maratha Reservation : बीडच्या माजलगाव तालुक्यातील सावरगांव इथं भारतीय जनता पार्टीच्या खासदार प्रितम मुंडेंचा ताफा मराठा तरुणांनी अडवला. आरक्षणाबद्दल भूमिका जाहीर करा, नाहीतर तुम्हाला बीड जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराही यावेळी मराठा तरुणांनी दिलाय. भाजपा खासदार प्रीतम मुंडे या दिव्यांगाच्या कार्यक्रमासाठी माजलगावमध्ये आल्या होत्या. यावेळी माजलगावहून परतत असताना त्यांचा ताफा अडवून मराठा तरुणांनी घोषणाबाजी केली. चार दिवसांपूर्वीच अंतरवली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी सभेत आरक्षणाचा प्रश्न लवकर मार्गी न लागल्यास राज्यातील एकाही नेत्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असं सांगितलं होतं. याच पार्श्वभूमीवर मराठा तरुणांनी भाजपा खासदार प्रितम मुंडेंचा ताफा अडवलाय. मराठा आरक्षणाची मागणी दिवसेंदिवस जोर धरत असून मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं, अशी मागणी या तरुणांकडून करण्यात आली.