Maratha Protest : 'मराठे कोणाच्या वाट्याला जात नाही, पण तुम्ही आमच्या वाट्याला गेला तर...', जरांगे पाटलांचा सरकारला इशारा - मनोज जरांगे पाटील सरकारला इशारा
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 30, 2023, 5:22 PM IST
जालना Maratha Protest : आज (३० ऑक्टोबर) मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा सहावा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी, 'मराठा आंदोलन भरकटत चाललंय. आंदोलनात जाळपोळीच्या घटना घडत आहे. याचा विचार मनोज जरांगेंनी करावा', असं आवाहन केलं होतं. याला आता मनोज जरांगेंनी उत्तर दिलं आहे. त्यांनी आज दुपारी अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलतान मनोज जरांगेंनी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. 'आंदोलन भरकटत चाललंय असं हे लोक म्हणतात, मात्र तेच आमचं कार्यालय का पाडतात?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, 'पोलिसांनी मराठी बांधवांना त्रास देऊ नये. आमच्या वाट्याला जाऊ नका. वाट्याला गेला तर लक्षात ठेवा', असा धमकीवजा इशाराही जरांगे पाटलांनी दिला. पाहा काय म्हणाले मनोज जरांगे पाटील..