कुणबी नोंदीची माहिती मिळण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचं कराडमध्ये जनसंपर्क कार्यालय, पाहा व्हिडिओ - कुणबी नोंदीची माहिती
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 8, 2023, 11:01 PM IST
सातारा Maratha Kranti Morcha Office: सातारा जिल्ह्यात कुणबी नोंदी तपासणीची मोहीम वेगाने सुरू आहे. महसूल दप्तरांची तपासणी करून कुणबी नोंदी तपासल्या जात आहेत. ( Kunbi Records Information) कुणबी नोंदीसंदर्भात लोकांमध्ये असलेली संभ्रमावस्था दूर व्हावी आणि कुणबी दाखले काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती मिळावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चाने शुक्रवारी कराडमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू केलं आहे. (Kunbi Records in Satara District) राज्यातील हे पहिलं जनसंपर्क कार्यालय आहे. तहसील कार्यालय परिसरात हे कार्यालय असून कुणबी दाखला काढताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी या कार्यालयातून प्रयत्न होणार आहेत. आज अखेर कराड तालुक्यात ११ हजारांहून अधिक कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मोडी आणि मराठी भाषेतील नोंदींची यादी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी प्रशासनाकडून घेतली आहे. त्यातील जवळपास ४ हजार नोंदी मराठी तर उर्वरित मोडी भाषेत आहेत.