Mangalprabhat Lodha Statement : एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना छत्रपतींसोबत करणे म्हणजे महाराजांचा अवमान - मनोज आखरे - Mangalprabhat lodha Statement
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17073852-thumbnail-3x2-sdkjs.jpg)
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर अद्याप पडदा पडला नाही. तोच भाजपा नेते तथा मंत्री मंगलप्रभात लोढा Minister Mangalprabhat lodha यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेशी केली आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. आत्ता त्यांच्या या वक्तव्यावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी टीका Manoj Aakhare on Minister Mangalprabhat lodha Statement केली आहे. ते म्हणाले की ‘मिंधे गटाच्या शिंदेसोबत शिवाजी महाराजांची तुलना म्हणजे शिवाजीमहाराजांचा अवमान आहे. याद राखा शिवाजी महाराजांची तुलना फितुरांसोबत करणार असाल तर हे अत्यंत निंदनीय आहे. ‘इथून पुढे भापज, आरएसएस किंवा कोणीही शिवाजी महाराजांचा अपमान करेल तर गुद्द्या ( बुक्क्या) शिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST