Ramadan 2023: खाण्यासाठी वाट्टेल ते.. चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याकरिता काश्मीरवरून पोहोचला थेट कोलकात्यात! - इफ्तार पार्टी
🎬 Watch Now: Feature Video
कोलकाता: मनपसंत खाद्यपदार्थाच्या प्रेमापोटी तरुणाने काश्मिर ते कोलकाता प्रवास केल्याची प्रथमच घटना घडली आहे. मोहम्मद अख्तर हा तरुण काश्मीरमधून थेट कोलकात्याच्या झकेरिया स्ट्रीटवरवर पोहोचला. कारण त्याला तिथे रोजा इफ्तार तिथे करायचा होता. रमजानच्या महिन्यात झकेरिया स्ट्रीट हे खाद्यप्रेमींसाठी चांगलीच पर्वणी असते. रमजानच्या महिन्यात झकेरिया स्ट्रीट येथे खाद्यपदार्थांची प्रचंड रेलचेल पाहायला मिळते. हा तरुण इफ्तारच्या वेळी चविष्ट खाद्यपदार्थांच्या शोधात पोहोचला. खाद्यपदार्थांची किंमत विचारून त्याने रेशमी कबाब आणि चिकन तंदूरीची ऑर्डर दिली. त्यानंतर मेजवानीचा आस्वाद घेण्यास सुरुवात केली.
अख्तरने ईटीव्ही भारतला सांगितले की, मी काश्मीरचा असून पहिल्यांदाच कोलकात्यात फक्त जेवणासाठी आलो आहे. झकेरिया स्ट्रीट या काळात दरवर्षी उत्सवाचे स्वरूप दिसते. संध्याकाळच्या नमाजानंतर खजूर आणि कोल्ड ड्रिंक घेऊन अख्तरने नाखोडा मशिदीसमोर इतरांसह उपवास सोडला. झकेरिया स्ट्रीटवरील खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी झालेली गर्दी सोशल मीडियावर पाहायला मिळाली. त्यानंतरच त्याने कबाब खायला सुरुवात केली. झकेरिया स्ट्रीटवरच्या दुकानांतील सर्व लोकप्रिय खाद्यपदार्थ त्याने घेतले. यामध्ये मुर्ग चंगेझी, मुर्ग तैमुरीर, फालुदा, हलीम, माई अकबरी, फिरनी, शाही तुकडे यांचा समावेश आहे. हाजी अलाउद्दीनच्या मिठाईने त्याने मेजवानी संपविली. अख्तरचा कोलकात्यात दोन दिवस मुक्काम आहे. यादरम्यान तो विविध पदार्थांचा आस्वाद घेऊन काश्मीरला परतणार आहे.