Man reached school with sword: गणवेशासाठी पैसे मिळाले नाही म्हणून तलवार घेऊन वडिलांचा शाळेत राडा - Araria Viral Video

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Jul 8, 2022, 5:41 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

अररिया: बिहारमधील अररियामध्ये एका मुलाचे वडील तलवार घेऊन शाळेत पोहोचले (Man Reached School With Sword). आपल्या मुलाच्या शाळेचा गणवेश आणि पुस्तकासाठी पैसे न मिळाल्याने ते नाराज होते. जोकीहाट ब्लॉकच्या भगवानपूरमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे ( Araria Viral Video ). व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लुंगी घातलेली एक व्यक्ती हातात तलवार घेऊन शिक्षकांना शिवीगाळ करत आहे. ती शाळेत पोहोचली, त्यावेळी मुलांचे वर्ग सुरू होते. त्याने शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना धमकी दिली. जर २४ तासात आपल्या पाल्याला गणवेश आणि पुस्तकाची रक्कम मिळाली नाही तर पुन्हा येईन. या घटनेनंतर शाळेतील शिक्षक आणि मुलांमध्ये घबराट पसरली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. व्हिडिओ पहा....
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.