थर्मल पॉवर स्टेशन केंद्राच्या युनिटवर आंदोलन; व्हिडिओ व्हायरल - कर्नाटकातील रायचूरच्या शक्ती नगरमध्ये आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
रायचूरन (कर्नाटका) - कर्नाटकातील रायचूरच्या शक्ती नगरमधील आरटीपीएस (रायचूर थर्मल पॉवर स्टेशन) केंद्राच्या 8 व्या युनिटच्या चिमणीवर एक मजूर सोमवारी बसून आंदोलन करत आहे. पगारवाढ, बोनससह विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी कंत्राटी कामगार सन्ना सुगप्पा यांनी हे आंदोलन केले. अचानक आंदोलन करत आहेत. केरळ येथील भवानी इरेक्टर्स कंपनीत ते अनेक वर्षांपासून कंत्राटी कामगार म्हणून काम करतात. कंत्राटी कामगारांना कंपनीने वेळोवेळी पगारवाढ, बोनस व इतर फायदे दिले पाहिजेत अशी त्यांची मागणी आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST