मराठा आरक्षणाची लढाई लढण्यात महाविकास आघाडीला रस नव्हता - चंद्रकांत पाटील - Technical Education Minister Chandrakant Patil
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 23, 2023, 9:44 PM IST
पुणे Chandrakant Patil : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढाई लढण्यात महाविकास आघाडीला स्वारस्य नव्हतं. याचाच परिणाम मराठा समाजावर होत असल्याची टीका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर महायुतीचं सरकार पूर्ण ताकदीनं लढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या पुनर्विलोकन याचिकेच्या सुनावणीचा निर्णय अतिशय आनंददायी आहे. या याचिकेमुळं मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करून त्यांना आरक्षण मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. दुर्दैवानं राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारला मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाची लढाई लढण्यात रस नव्हता, असा आरोप त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस सरकारनं मराठा आरक्षण दिलं होतं. मात्र, ते न्यायालयात टिकलं नाही, असं देखील पाटील म्हणाले.