Ajit Pawar and Sharad Pawar meet: अजित पवार-शरद पवार यांच्या भेटीवरून देवेंद्र फडणवीस यांची मिश्किल टिप्पणी, म्हणाले... - ajit pawar and sharad pawar meet
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13-08-2023/640-480-19254595-thumbnail-16x9-fadnavis.jpg)
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात बैठक झाली. पुण्यातील एका व्यावसायिकाच्या घरी या दोन्ही नेत्यांची बैठक झाली. दोन्ही नेत्यांची बैठक ही खासगी भेट असल्याचे बोलले जात आहे. यावर विचारले असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार आणि शरद पवार यांची बैठक कधी झाली याची कल्पना नव्हती. याविषयीची माहिती खुद्द फडणवीस यांनी औरंगाबाद विमानतळावर पत्रकारांशी बोलताना दिली. मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, याबाबत मला स्वतःला माहिती मिळाली तर मी सर्वांना देईल. तर आगामी निवडणुका भाजपा- शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गट राष्ट्रवादी यांचा फॉर्मुला ठरला असल्याची चर्चा आहे. त्यावरही फडणवीस यांनी भाष्य केले. यावर अद्याप काही निर्णय झालेला नाही, युतीच्या जागा वाटपाबाबत समन्वय समिती काम करत आहे. जागेची नियोजन समितीद्वारे केले जाईल. त्यानंतर तो निर्णय होईल, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.