Praful Patel : राष्ट्रवादी पक्ष फुटला? प्रफुल पटेल यांनी थेटच सांगितलं... - Praful Patel Reaction On Deputy CM
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 27, 2023, 10:26 PM IST
|Updated : Aug 27, 2023, 10:50 PM IST
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : अजित पवार यांनी भाजपासोबत हातमिळवणी करून ते उपमुख्यमंत्री झाले. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही, असं पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी याआधी स्पष्ट केलं होतं. तसेच खरोखर राष्ट्रवादी पक्ष फुटलेला नाही, अजित पवार यांच्या नेतृत्वात 43 पेक्षा जास्त आमदार आहेत. बहुसंख्य म्हणजे 90 टक्के नेते आणि कार्यकर्ते, पदाधिकारी अजित पवार यांच्याबरोबर आहेत, त्यामुळे आमच्याकडे पक्ष आहे. शरद पवार यांच्याबद्दल मला विचारू नका, मी आमची भूमिका स्पष्ट करतो. असं स्पष्टीकरण अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी दिलं. अजित पवार आमचे नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली बीडची सभा झाली. यात आमची भूमिका मांडल्याचं पटेल म्हणाले.