विधिमंडळ अधिवेशन 2023 : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी तळली भजी, बेरोजगारीकडं वेधलं लक्ष - आमदार रोहित पवार
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/15-12-2023/640-480-20273388-thumbnail-16x9-maharashtra-assembly-winter-session-2023.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Dec 15, 2023, 3:29 PM IST
नागपूर Maharashtra Assembly Winter Session 2023 : विधान भवनाच्या पायऱ्यांवर आज सलग सातव्या दिवशी विरोधकांनी जोरदार आंदोलन केलं. विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी बेरोजगारी आणि पदभरतीच्या महत्वपूर्ण मुद्याकडं लक्ष वेधण्यासाठी चक्क विधान भवनाच्या पायऱ्यांवर भजी तळून आंदोलन केलं. त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांनी द्राक्ष बाग शेतकऱ्यांच्या व्यथेबाबत सडलेली द्राक्षं घेऊन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आहे. यावेळी विरोधी पक्षातील आमदारांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या, पीएच डी करुन काय दिवे लावणार, या वक्तव्याचा निषेध म्हणून 'बेरोजगारी वाढली, काय दिवे लावले', अशा घोषणाबाजीनं विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. त्यामुळं आमदारांच्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून गेला.