Maharashtra Assembly Session 2023 :निधी वाटपावरुन विरोधक आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी सरकारविरोधात घोषणाबाजी - महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसऱ्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. आजही विरोधकांनी सरकारच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. विधान भवनाच्या पायऱ्यावर सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे वित्तमंत्री अजित पवार यांनी आमदारांना निधी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप विरोधकांनी यावेळी केला. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, भाई जगताप, वर्षा गायकवाड विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे या आंदोलनात सहभागी झाले होते. अधिवेशनात अनेक मुद्दे चर्चेला असताना त्यांना सत्ताधाऱ्यांकडून योग्य ती उत्तरे सुद्धा दिली जात नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पुढील आठवड्यात सोमवार, मंगळवार अधिवेशनास सुट्टी असल्याने केवळ तीन दिवसाचे अधिवेशनाचे कामकाज चालणार आहे. सरकारकडून शासन आपल्या दारीची फक्त जाहिरातबाजी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांकरिता जनता हे कुटुंब असते. त्यांनी भेदभाव करणे योग्य नसल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.