VIDEO भाजपकडून दक्षिण मध्य मुंबईत माफी मांगो आंदोलन, जोरदार घोषणाबाजी - Derogatory Remark Against Hindu God And Legends
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई भाजपकडून दक्षिण मध्य मुंबईत माफी मांगो आंदोलन करण्यात येत Mafi Mango Andolan In South Central Mumbai आहे. हिंदू देवता व महापुरूषांविरोधात वारंवार अपमानास्पद वक्तव्य करण्यात येत आहेत. त्यामुळे समाजाच्या भावना दुखवणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात तसेच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांविरोधात मुंबईमध्ये माफी मांगो आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईतील सहा विभागातील भाजपा खासदार, आमदार आणि पदाधिकारी यात सहभागी झाले आहेत. दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघात सुद्धा आंदोलन छेडण्यात आले. सुषमाताई अंधारे यांची वक्तव्ये, प्रभू श्रीरामचंद्र यांचा अपमान, श्री कृष्ण, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची खिल्ली, संतश्रेष्ठ एकनाथांची चेष्टा आणि वारकरी संप्रदायांचा अपमान Derogatory Remark Against Hindu God And Legends या सर्वांच्या पार्श्वभूमीवर प्रचंड जनप्रक्षोभ निर्माण झाला आहे. या विरोधात मुंबई हे माफी मागो आंदोलन सुरू आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST