Lucknow Crime News : माणुसकीला काळीमा!..बाप भांडल्याने मुलांना कारने चिरडण्याचा प्रयत्न, पहा व्हिडिओ - Lucknow car Viral Video
🎬 Watch Now: Feature Video
लखनऊ : लखनऊमध्ये एका दबंग तरुणाने तीन लहान मुलांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. कारने धडक दिल्याने हे तिघेही जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलिहाबाद येथील रहिवासी वीरेंद्र कुमार यांचे गावातीलच गोविंदसोबत वैर होते. गेल्या गुरुवारी त्यांची तिन्ही मुले शिवानी, स्नेह आणि कृष्णा घराबाहेर खेळत असताना कारमधून आलेल्या गोविंद याने तिन्ही मुलांना जीवे मारण्याच्या उद्देशाने धडक दिली, यात तिन्ही निष्पाप जखमी झाले. वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक करत त्याची कार ताब्यात घेतली आहे. यासोबतच जखमी मुलांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. आरोपीला मात्र लगेच जामीन मिळाला आहे. ईटीव्ही भारत या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही.