Rice Crop to Make an Idol of Vitthal : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याने भातशेतीत साकारली भव्य विठ्ठल प्रतिमा, पाहा व्हिडिओ - Ashadi Ekadashi will be celebrated

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 9, 2022, 11:02 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

पुणे जिल्ह्यातील मुळशी ( Mulshi in Pune district ) येथील लक्ष्मी शिंदे व बाळकृष्ण शिंदे ( Lakshmi Balkrishna Shinde Couple ) या दाम्पत्यांनी मुळशीतील वातुंडे गावातील ( Vatunde village in Mulshi ) शेतात भात रोपांची अनोखी हिरवीगार 120 फूट लांब विठ्ठलाची मूर्ती ( Rice Crop to Make 120 feet Long Vitthal ) साकारली आहे. उद्या सर्वत्र आषाढी एकादशी साजरी ( Ashadi Ekadashi will be celebrated ) होणार असून, सध्या पंढरीची वारी सुरू असतानाच ही भात रोपांद्वारे तयार झालेले विठ्ठलाचे रूप पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. बाळकृष्ण शिंदे यांनी आपल्या शेतात विठ्ठल शोधला आणि पेरला आणि 120 फूट लांब आणि 60 फूट रूंद उंचीचा पांडुरंगरूपी भात पीक उगवून विठ्ठलाची मूर्ती साकारली आहे. महिन्यापूर्वी शेतात बियाणे टाकून दाढ केली. भाताच्या दाढी विठ्ठलरूपी फक्कीने काढलेल्या डिझाईनमध्ये तंतोतंत पेरल्या, पाऊस होताच आता हा पेरलेला विठ्ठल लक्षवेधी ठरला आहे. सिव्हील इंजिनिअर असलेल्या बाळकृष्ण शिंदे यांनी सुरुवातीला अ‍ॅटोकॅडमध्ये डिझाईन तयार केले. ते जमिनीवर रेखाटून त्यावर फक्की टाकली. त्यामध्ये भाताची रोपांची विठ्ठलरूपी पेरणी केली. आता पाऊस होताचा हा हिरवागार विठ्ठलाचे दर्शन होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.