Leopard Attack: दबक्या पावलांनी आला...अन् फार्म हाऊसच्या दारातच शिकार करून गेला; बिबट्याचा थरार सीसीटीव्हीत कैद - वनरक्षक अधिकारी देविदास अडे
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे : मुरबाड तालुक्यात माळशेज घाट परिसरातील जंगलात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. टोकावडे भागात असलेल्या एकलहरे गावाच्या हद्दीत एक फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसच्या मुख्य दारात गुरुवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास पाळीव कुत्रा झोपला होता. त्याच सुमारास बिबट्या फार्म हाऊसमध्ये शिकारीसाठी शिरला. त्या बिबट्याने त्या पाळीव कुत्र्याची शिकार केली. कुत्र्याची शिकार झाल्याची माहिती स्थानिक गावकऱ्यांनी वन विभागाच्या पथकाला दिली. माहिती मिळताच त्यांनी वनपथकाला घेऊन घटनास्थळी जाऊन मृत अवस्थेत पडलेल्या कुत्र्याचा पंचनामा करीत ताब्यात घेतले. दरम्यान टोकावडे पश्चिम भागातील वनरक्षक अधिकारी देविदास अडे यांच्याशी वारंवार मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. तर टोकावडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुलकर्णी याच्यांशी संपर्क साधला असता, या घटनेची नोंद वन विभागाकडे असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.