Video : 'समृद्धी'ने अडवलेल्या पाण्यामुळे भात पिकाचे मोठे नुकसान
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक : समृद्धी महामार्ग इगतपुरी (Samrudhi Highway Igatpuri) तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पावसाळ्यापूर्वी लोकांना त्रास होईल अशी कामे पूर्ण करण्याऐवजी शेतकऱ्यांना त्रास व्हावा म्हणून काही कामे मुद्दाम केली जात नाहीत. समृद्धी महामार्गाचे काम सुरु असणाऱ्या तळोघ येथील नदीपात्रामध्ये संबंधित ठेकेदाराने आडवा बांध केल्याने भात शेतात (Paddy farming losses Nashik) मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिणामी ह्या सर्व शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.यासंदर्भात संबंधित ठेकेदाराला शेतकऱ्यांकडून संपर्क साधला जात आहे. मात्र भ्रमणध्वनी उचलला जात नसल्याने शेतकरी संतापले आहेत. इगतपुरी तालुक्यात अडवण्यात आलेले पाणी शेतांमध्ये आल्याने, भात पिकाचे मोठे नुकसान झाले (Damage Crop In Nashik) असून संपूर्ण बांध तुटले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांनी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याकडे तक्रार केली असून त्यांनी लक्ष घालणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. लवकरात लवकर नुकसान भरपाई न केल्यास आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST