ETV Bharat / politics

यशोमती ठाकूर यांच्या प्रचाराचे फाडले बॅनर; वलगाव आणि नया अकोला गावात तणाव - YASHOMATI THAKUR

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. अशातच अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या (काँग्रेस) उमेदवार यशोमती ठाकूर यांच्या प्रचाराचे अज्ञातांनी बॅनर फाडल्याची तक्रार काँग्रेसनं केली.

Yashomati Thakur Banner
यशोमती ठाकूर पोस्टर (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2024, 6:31 PM IST

अमरावती : तिवसा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या वलगाव आणि वलगावपासून काही अंतरावर असणाऱ्या नया अकोला या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी प्रचारासाठी लावलेले बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्याची तक्रार काँग्रेसनं केली. त्यामुळं काहीसा तणाव निर्माण झाला. या संदर्भात काँग्रेसनं वलगाव पोलीस ठाण्यात (Walgaon Police Station) तक्रार दाखल केली.

बॅनर जाळण्याचा प्रयत्न : वलगाव येथे यशोमती ठाकूर यांचे बॅनर फाडले असताना, नया अकोला या गावात यशोमती ठाकूर यांच्या प्रचारासाठी लावलेले बॅनर जाळण्यात आल्याची तक्रार काँग्रेसनं पोलिसात केली. हा संपूर्ण प्रकार रविवारी रात्री घडला. सोमवारी सकाळी याबाबत माहिती मिळताच काँग्रेसचे कार्यकर्ते वलगाव आणि नया अकोला या ठिकाणी पोहोचले. वलगाव येथील अहिल्यादेवी चौक, धनगर पुरा भागात अनेक ठिकाणी ठाकूर यांचे बॅनर फाडण्यात आल्याचं कार्यकर्त्यांना दिसून आलं.

प्रतिक्रिया देताना काँग्रेस कार्यकर्ता (ETV Bharat Reporter)

वलगाव पोलीस ठाण्यात तक्रार : वलगाव आणि नया अकोला या ठिकाणी यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ लावण्यात आलेले बॅनर फाडल्या प्रकरणात अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे यांनी वलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली. विरोधकांनी हा प्रकार केला असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारातून विरोधकांची विकृत मानसिकता लक्षात येते, असा हल्लाबोल हरीश मोरे यांनी केला. दरम्यान, वलगाव पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली.

यशोमती ठाकूर यांच्याकडं चार कोटींची मालमत्ता : तिवसा विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅट्रिक साधणाऱ्या यशोमती ठाकूर या चौथ्यांदा काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी दिलेल्या शपथपत्रातील नोंदीनुसार त्यांच्याकडं चार कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

हेही वाचा -

  1. रवी राणा, बच्चू कडू, यशोमती ठाकूर कोण किती श्रीमंत? जाणून घ्या संपत्ती
  2. तिवसामध्ये यशोमती ठाकूर यांना कोण देणार टक्कर! जाणून घ्या, राजकीय समीकरणे
  3. "मतदान करताना आपल्या मुलांच्या..."; अमरावतीतून विनेश फोगाटनं मतदारांना केलं आवाहान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.