Kavanai Fort In Nashik: नाशिकच्या कावनई किल्ल्याहून दरड कोसळली; बघा व्हिडीओ... - Kavanai Fort In Nashik
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक : रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळगडावरील इर्शाळवाडीवर बुधवारी दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असताना नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कावनई किल्ल्याचा भाग कोसळलेला आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवित आणि वित्तहानी झालेली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध अशा 14 व्या शतकातील कावनई किल्ल्यावरून दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या किल्ल्याच्या खाली प्राचीन असे कावनई गाव असून शिवकालीन तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. या घटनेमध्ये किल्ल्याच्या पायथ्याला पाच सहा घरे असल्याचे सांगण्यात आले आहे; परंतु या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही अशी माहिती देण्यात आली.
कावनई किल्ल्याचे महत्त्व : नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात कावनई किल्ला आहे. हा किल्ला 2500 फूट उंच असून तो गिरीदुर्ग प्रकारातील आहे. इगतपुरी पश्चिम डोंगर रांगेतील कावनई किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. इगतपुरी परिसरात असणारी सह्याद्रीची रांग दोन दिशांना विभागली जाते. एक पूर्वेकडे तर दुसरी पश्चिम-पूर्वेकडे असणाऱ्या सह्याद्रीच्या रांगेला कळसूबाई, कुलंग, अलंग, अवंढ-पट्टा हे किल्ले येतात. तर पश्चिमेकडे असणाऱ्या रांगेत त्रिंगलवाडी, कावनई, हरीहर, ब्रम्हगिरी, अंजनेरी हे किल्ले येतात.