Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या चरणी साडेतीन किलो सोने, अर्पण केलेल्या वस्तुंचा पहिल्या दिवशी 'असा' लिलाव - Lalbaugcha Raja Donation public auction
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 2, 2023, 7:19 AM IST
|Updated : Oct 2, 2023, 9:38 AM IST
मुंबई Lalbaugcha Raja : गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याच्या आणि चांदीच्या वस्तूंचा लिलाव रविवारपासून सुरू झालाय. या लिलावास भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिलीय. गणेशोत्सव काळात लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव लालबागच्या राजाच्या व्यासपीठावर झाला. यामध्ये अनेक सोन्याच्या आणि चांदीच्या वस्तुंचा लिलाव करण्यात आला. दरवर्षी प्रमाणं यावर्षीसुद्धा या लिलावात गणेशभक्तांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतलाय. यावर्षी लालबगाच्या चरणी अर्पण केलेल्या ३.५ किलो सोनं आणि ६४ किलो चांदीचा लिलाव करण्यात येत आहे. यात १ किलो सोन्याचा हार आहे, तर ५२ सोन्याच्या वस्तु आणि ७२ चांदीच्या वस्तुंचा लिलाव करण्यात आलाय. लालबागच्या राजाच्या चरणी इलेक्ट्रीक दुचाकी अर्पण केली होती. या गाडीची विक्री १ लाख ६५ हजार रूपयांना लिलावात झालीय. त्याचप्रमाणं पाच तोळ्याच्या सोन्याचा हार 3 लाख 33 हजार 333 रुपयांना लिलावात विक्री करण्यात आलाय. लाकडी बॅट या लिलावात सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. क्रिकेटसाठी वापरतात ती बॅट देखील एका चिमुकल्या भाविकानं 20 हजार रुपयांना खरेदी केलीय.