Leopard Viral Video Truth आजाराने मरत होता अन् लोक फोटो काढत होते... डॉक्टरांनी सांगितले व्हायरल व्हिडिओमागील सत्य - video of citizens doing photo session
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर - जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील रायगव्हाण येथे एका शेतामध्ये आजारी अवस्थेत एक बिबट्या आढळून आला होता. हा बिबट्या एका शेतात दिसून आल्यानंतर स्थानिकांनी त्याच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढलेले काही फोटो व्हायरल ( citizens doing photo session with leopard ) झाले होते. शेतात कामाला जात असताना काही लोकांना या बिबट्याचे दर्शनदेखील झाले होते. मात्र तो आजारी असल्याने खाली पडलेल्या अवस्थेत व त्याचे डोळेदेखील ( leopard video viral truth ) उघडत नव्हते. यानंतर स्थानिक लोकांनी वन कर्मचाऱ्यांना तात्काळ संपर्क साधला असता वनविभागाने या बिबट्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार केले. मात्र उपचार अयशस्वी ठरल्याने आज अखेर या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. पशु वैद्यकीय अधिकारी एम. जी. कहाडे यांनी यांनी ( Dr MG Kahade on leopard death ) बिबट्याला न्यूमोनिया झाला होता, अशी माहिती ( leopard death in Ahmednagar ) दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST