Fasting For Baliraja : ठाकरेंचा शिलेदार कैलास पाटील यांचा बळीराजासाठी आमरण उपोषण - farmers crop insurance compensation money
🎬 Watch Now: Feature Video
उस्मानाबाद आमदार कैलास पाटील यांच्या आंदोलनाला आता ग्रामीण भागातून प्रतिसाद मिळू लागला आहे. आज उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा गावातील काही शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीत गाडत आमदार कैलास पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे. यापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील 350 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीं 100 सहकारी सोसायट्या 80 पेक्षा जास्त राजकीय सामाजिक संघटनांनी पाठींबा या आंदोलनाला दिला आहे. गेल्या चार दिवसापासून आमदार कैलास पाटील हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा विमा मिळावा, म्हणून उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. सुप्रीम कोर्टाने बजाज अलाईनज कंपनीला शेतकऱ्यांना विमा 3 आठवड्यात देण्याचे आदेश दिले होते. परंतु 3 आठवडे उलटूनही या कंपनीने शेतकऱ्यांना विमा दिला नाही. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील हे जोपर्यंत विमा कंपनी देत नाही, तो पर्यंत आमरण उपोषण करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST