Vidhan Parishad Elections : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान - मतदान विधानपरिषद निवडणूक
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15605946-thumbnail-3x2-news.jpg)
मुंबई - विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज ( सोमवारी ) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ११ उमेदवार रिंगणात असून गुप्त मतदान प्रक्रिया असल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. त्यामुळे दगाफटका होण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्षांचे यामुळे धाबे दणाणले आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi In MLC Election ) आणि विरोधीपक्ष भाजपाची ( BJP In MLC ) उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. मात्र पाडापाडीचे राजकारण रंगणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपाच्या प्रसाद लाड यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST